रामलीलेची तुलना पॉर्नशी? प्रकाश राज अडचणीत
अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेले प्रकाश राज रामलीलेसंद्रभात केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नुकत्याच एका व्हायरल झालेल्या व्हीडिओत ते रामलीलेची तुलना पॉर्नशी करताना दिसत आहेत. हा व्हीडिओ 2018 सालचा आहे.
योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना प्रकाश राज यांनी आपलं मत मांडलं होतं. योगींकडून ज्याप्रमाणे रामलीलाचा प्रचार करण्यात येत आहे, हे पाहता काही सामाजिक घटकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
यावर उत्तर प्रदेश सरकारने रामलीला या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन का करू नये, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याच प्रश्नाचं उत्तर देत, लहान मुलं पॉर्न पाहत असल्यास तुम्ही त्यांना अडवणार नाही का?" असा प्रतिप्रश्नच त्यांनी मुलाखतकारांपुढे उपस्थित केला.