गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 28 मार्च 2020 (14:44 IST)

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची करमुणक म्हणून दूरदर्शनवर आपल्या काळात गाजलेल्या ‘रामायण’ व ‘महाभारत’ यांसारख्या मालिका पुन्हा एकदा सुरु केल्या आहेत. या यादीत आता ‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ या आणखी दोन मालिकांची भर पडली आहे. 
 
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव या लोकप्रिय मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. ‘ब्योमकेश बक्क्षी’ ही मालिका रोज सकाळी 11 वाजता दूरदर्शन वाहिनीवर दाखवली जात आहे. तर ‘सर्कस’ मालिका रात्री 8 वाजता दाखवली जात आहे. दूरदर्शनच्या ट्विटर हँडलवरुन याबात माहिती देण्यात आली.
 
‘ब्योमकेश बक्क्षी’ ही मालिका प्रसिद्ध बंगाली लेखक शरदेंदु बंद्योपाध्याय यांच्या डिटेक्टिव्ह कथानकांवर आधारित आहे. या मालिकेत अभिनेता रजित कपूर यांनी ‘ब्योमकेश बक्क्षी’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच सर्कस या मालिकेत बॉलीवूडचा बादशाह शाहरुख असल्यामुळे याचा वेगळाच चार्म आहे.