सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 ऑक्टोबर 2019 (14:32 IST)

शाहरुखने वाचवले ऐश्वर्याच्या मॅनेजरचे प्राण

दर दिवाळीप्रमाणे यंदा देखील बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरी ‘जलसा’ येथे पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टीत बरेच कलाकार सामील झाले होते मात्र या दरम्यान एक अप्रिय घटना घडली ज्यात ऐश्वर्या राय बच्चन यांची मॅनेजर अर्चना सदानंदच्या लेहंग्याला आग लागली. मात्र शाहरुख खानच्या रिअल हिरो प्रमाणे अॅक्शन घेतल्यानुमळे मोठा अपघात टळला.
 
‘जलसा’ येथे ऐश्वर्याची मॅनेजर अर्चना तिच्या मुलीसोबत होती. रात्रीच्या तीन वाजेच्या सुमारास पाहुण्याची संख्या कमी झाली होती. त्या दरम्यान जळत असलेल्या एका पंगतीमुळे अर्चनाच्या लेहंग्याला आग लागली. हे पाहताच क्षणी जराही विचार न करता शाहरुख खानने त्वरित त्याच्या शेरवानीचं जॅकेट काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला.
 
या दुर्घटनेत अर्चना यांचे हात व पाय 15 टक्के भाजले. अर्चना यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर शाहरुखच्या या प्रसंगावधानाचे बॉलीवूडच नव्हे तर पूर्ण सोशल मीडियावर कौतुक होत आहे.