सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By अनिरुद्ध जोशी|
Last Modified: मंगळवार, 21 एप्रिल 2020 (22:13 IST)

प्रभू श्रीरामाने कपट केले नाही पण श्रीकृष्णाने केलं असे का..?

याचं सर्वात मोठं उत्तर म्हणजे की श्री विष्णूंचा रामाचा अवतार हा मर्यादेत बांधलेला होता. पण श्रीकृष्ण अवतार पूर्ण अवतार असे. श्रीकृष्ण सर्व कलेत पारंगत असे. पण आज आपणास आम्ही इथं वेगळंच सांगत आहोत. भगवान श्रीरामाचा काळातील कारभार त्रेतायुगाचा शेवट असे. अशी आख्यायिका आहे की या सतयुगात लोकं पूर्णरीत्या प्रामाणिक, धार्मिक आणि खरे, नीतिमान आणि सद्गुणी होते. या युगात पाप फक्त 0% आणि पुण्य 100% होते. धर्माचे 4 पाय असे. त्रेतायुगात धर्माचे तीन पाय असे, या युगात पापाचे प्रमाण 25% आणि पुण्य 75 % इतके असे. द्वापर युगात धर्माचे फक्त 2 पाय असे. या युगात पाप 50% आणि पुण्य 50% असे. कळी काळात धर्माला पायच नाही या युगात पाप 75% आणि पुण्य 25% आहे. 
 
श्रीरामाच्या काळात पापी लोकं पण पुण्यात्मा होते. जसे रावणाने सीतेचे हरण करून पाप केले होते तरी ते पुण्यात्मा होते. तसेच शिवभक्तही होते. कधी ही त्यांनी सीतेला तिच्या उसाचे विरुद्ध स्पर्श केले नाही की तिच्याशी बळजबरीने लग्नही केले नाही. रावणाच्या परिवारात विभीषणासारखे संतही होते. वानरराज बाली हा एक वाईट वानर असला तरीही तो धर्माच्या ज्ञाता होता. त्याच्या बायको तारा आणि मुलाने अंगदाने धर्माचे समर्थन केले. याचा अर्थ असा की त्या काळातील 75% लोकांना धर्माचे ज्ञान असे. अश्या परिस्थितीत कोणीही अश्या युक्तीचा विचार करू शकत नाही जी धर्माविरुद्ध आहे. लोकांना पाप करण्याची लाज वाटायची त्यांना असे केल्याचा पश्चाताप होत असे. प्रभू श्रीरामाला देखील रावणाचे वध केल्यावर वाईट वाटले. एका महान व्यक्तीचा वध केल्यानंतर चे पाप टाळण्यासाठी त्याने तप केले. 
 
श्रीकृष्णाच्या काळात सर्व लोकं पापीच होते. पापी असण्याचा बरोबर क्रूरही होते. धार्मिक कृत्ये करण्याचा कोणाचा ही स्वभावच नसे. निरागस अभिमन्यूचा निर्दयपणाने वध करीत असताना त्यावेळी काय त्यांचे धार्मिक विचार होते. कौरवांनी कपट करून पांडवांना वनवासामध्ये पाठविले तसेच वारणावतमध्ये त्यांनी कपट करून त्यांना ठार मारण्याचे योजिले होते. काय ते धर्माचं वागणं होत का..? 
 
आपण अश्या लोकांकडून कसे काय धर्माने वागण्याची अपेक्षा करू शकतो ज्या वेळेस भरलेल्या सभेत द्रौपदीला चिरडून टाकणाऱ्या अधर्मी लोकांकडून न्याय आणि चांगल्या वर्तनाची अपेक्षा कशी काय करता येईल. द्रौपदीला भरलेल्या बैठकीत निर्वस्त्र करीत असताना भीष्म कसे काय शांत बसू शकतात. स्वतःच्या सासू, सासरे, मेहुण्याला तुरुंगात टाकून जिवंत असणाऱ्या लोकांकडून (धृतराष्ट्र) धर्माची अपेक्षा करू शकतो का ? काशी नरेशच्या मुली (अंबा, अंबिका, अंबालिका) यांचे अपहरण करून सत्यवतीच्या मुला (विचित्रवीर्यशी) बळजबरीने लग्न लावून देणाऱ्या लोकां(भीष्म) कडून धर्माची अपेक्षा करणे योग्य आहे का ? त्याच प्रमाणे गांधारी आणि तिचे वडील सुबल यांचा इच्छे विरुद्ध भीष्माने धृतराष्ट्राशी गांधारीचे लग्न लावून दिले. कौरवांचा बाजूने तर क्रूरतेचे भरपूर किस्से महाभारतात पसरलेले आहे. अश्या कपटी लोकांना युद्धामध्ये जिंकण्याची संधी मिळाली असती तर त्यांनी युद्धही जिंकले असते, आणि आज इतिहासच वेगळा असता. 
 
श्रीकृष्णाने आपल्या काळ आणि परिस्थितीनुसार निर्णय घेतले. आचार्या गुरु द्रोणाचे वध, दुर्योधनाच्या मांडीवर मारणे, दुःशासनच्या छातीला फाडणे, जयद्रथाची फसवणूक, निःशस्त्र असलेल्या कर्णाचा वध, जरासंधाचा वध हे सर्व करणे न्यायाची मागणी होती. जेव्हा शकुनी, जयद्रथ, जरासंध, दुर्योधन, कुशासन या सारख्या क्रूर आणि अनैतिक शक्तींचे ज्ञाता सत्य आणि धर्माला नष्ट करण्यासाठी आक्रमण करतात तेव्हा नैतिकता निरर्थक ठरते. आता विजय महत्त्वाचा आहे. फक्त विजय. ते द्वापर युग होते आता हे कलयुग आहे. म्हणून सावध राहा. श्रीराम आणि मारुती यांचे नावच सांभाळणारे, तारणारे आणि हाताळणारे आहे.
 
संदर्भ : महाभारत श्रीकृष्ण भीष्म पितामह संवाद