शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Modified: सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (11:39 IST)

महाशिवरात्री शुभ मुहूर्त आणि सोपी पूजा विधी

वैष्णव संप्रदायानुसार सूर्योदयाच्या तारखेप्रमाणे या वर्षी 21 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. तसेच शैव संप्रदायानुसार निशीथ (मध्यरात्री) मध्ये चतुर्दशी तिथी असल्याने व्रताचे पारायण करायला हवे.
 
शिवरात्रीला शंकराला प्रसन्न करण्यासाठी रुद्राभिषेक करतात. शिवरात्रीला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन देवळात जाऊन ॐ नम: शिवाय 
मंत्राचे जप केले पाहिजे. नंतर शिवलिंगावर मध, पाणी आणि दुधाने अभिषेक केले पाहिजे. बेलाचे पान (बिल्वपत्र), बेलफळ, धोत्रा, फळ आणि फुले शंकराला अर्पित करायला हवे. नंतर आरती करावी. 
 
महाशिवरात्री शुभ मुहूर्त
21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:20 मिनिटे ते 22 फेब्रुवारी 7:30 ते 2 वाजे पर्यंत आहे.
 
पंचामृताने अभिषेक करण्याचं महत्त्व
पंचामृत (पाणी, गूळ, तूप, मध आणि दही) मध्ये समाविष्ट पदार्थांचे महत्त्व जाणून घ्या. पाणी- शुद्धी, गूळ- सुखप्राप्ती, तूप- विजेते, मध- मधुरभाषी आणि दही- समृद्धी प्राप्ती. या साठी पंचामृताने रुद्राभिषेक करावयाचे महत्त्वाचे आहे. पंचामृताने स्नान घातल्याने किंवा अभिषेक केल्याने शंकर प्रसन्न होतात.