सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Updated : बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (16:34 IST)

शिवाचा सगळ्यात आवडता दिवस महाशिवरात्री

अनेक कारणांमुळे हा दिवस विशेष आहे आणि या दिवशी महादेवाची आराधना केल्याने किती तरी पटीने पुण्य लाभतं. जाणून घ्या का खास आहे हा दिवस- 
 
अशी मान्यता आहे की या दिवशी महादेव पृथ्वीच्या अधिक जवळ येतात. 
या दिवशी महादेव तमोगुणांचे प्राशन करतात तसेच यादिवशी ते विश्रांती घेतात म्हणून महाशिवरात्री हा दिवस महादेवाचा सर्वात आवडता दिवस मानला गेला आहे.
तसेच अनेक भक्तांना दर सोमवारी महादेवाची उपासना करणे शक्य होत नाही अनेक भक्त 16 सोमवर व्रत धरु इच्छित असतात पण ते त्यांच्यासाठी शक्य होत नाही अशात केवळ महाशिवरात्रीचा एका उपास केल्याने सर्व व्रतांचे फळ मिळते. 
महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तीभावे शिवाची आराधना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. 
समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी महादेवांनी प्राशन केले होते आणि संपूर्ण जगाला विनाशापासून वाचवले होते म्हणून त्यांचा आभार म्हणून किंवा ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री मानला गेला आहे.
या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते, असे देखील म्हटलं जातं. 
महाशिवरात्रीला रात्री 12 ते 3 या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो. 
या दिवशी महादेवाला अभिषेक करुन, बेलपत्र, पांढरी फुले, धोत्रा, आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण करणे शुभ ठरतं.