शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 सप्टेंबर 2019 (10:03 IST)

ऐकलं का ? अभिषेक आणि विवेक ओबेरॉय यांनी एकमेकांना मारली मिठी

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात जुने वाद वसरुन अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेता विवेक ओबेरॉय एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे.
 
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. तिच्या या कामगिरीसाठी मुंबईमध्ये सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी अनेक बॉलिवूड कलाकारांनी तेथे हजेरी लावली होती. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन हे मुलगा अभिषेक बच्चनसोबत तेथे उपस्थित होते. तर दुसरीकडे अभिनेता विवेक ओबेरॉय वडिल सुरेश ओबेरॉय आणि पत्नी प्रियांकासोबत या कार्यक्रमला उपस्थित होता. सुरेश ओबेरॉयने अमिताभ यांना पाहताच मिठी मारली. काही वेळानंतर अभिषेक आणि विवेक एकमेकांसमोर आले आणि त्यांनीदेखील एकमेकांना मिठी मारली आहे.