रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 9 सप्टेंबर 2019 (11:53 IST)

अक्षय कुमारने बर्थडेवर चाहत्यांना दिले गिफ्ट, आपले पहिले ऐतिहासिक चित्रपट 'पृथ्वीराज'चे शेअर केले पोस्टर

बॉलीवूडचे खेळाडू अक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त ऐक मोठी अनाउंसमेंट झाली आहे. अक्षयने चाहत्यांना खास गिफ्ट देत आपले अपकमिंग चित्रपट 'पृथ्वीराज'चे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरला शेअर करत अक्षय ने लिहिले, मला फारच आनंद होत असून मी आपल्या वाढदिवसानिमित्त आपले पहिल्या ऐतिहासिक चित्रपटाचे पोस्टर शेअर करत आहे.    
 
अक्षयने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'हिंदुस्तानच्या इतिहासातील सर्वात बहादूर आणि निडर राजा पृथ्वीराज चौहानची भूमिका करणे माझ्यासाठी फारच सन्मानाची बाब आहे. चित्रपट पृथ्वीराज एक प्रयत्न आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचे ऍलन झाल्याने ही माझ्यासाठी अधिकच खास झाले आहे.    
सांगायचे म्हणजे या चित्रपटासोबतच अक्षय लवकरच चित्रपट गुड न्यूजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर खान, कियारा अडवाणी आणि  दिलजीत दोसांझ लीड रोलमध्ये आहे.  
 
अक्षयच्या मिशन मंगलची गोष्ट केली तर या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे, एवढंच नव्हे तर अद्यापही या चित्रपटाची कमाई सुरूच आहे. चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा आणि शरमन जोशी लीड रोलमध्ये होते.