शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

मिशन मंगल’ २०० कोटी रुपयांच्या दिशेने

अक्षय कुमार, विद्या बालन यांची मुख्य भूमिका असलेला ‘मिशन मंगल’ प्रदर्शित होऊन आता बरेच दिवस लोटले आहेत. मात्र अजुनही या चित्रपटाची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. चाहत्यांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळे आता हा चित्रपट २०० कोटी रुपयांच्या दिशेने विक्रमी मार्गक्रमण करताना दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत १९३ कोटी १४ लाख रुपयांची कमाई केली आहे. प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद राहिला तर लवकरच हा चित्रपट २०० कोटींच्या घरात पोहोचेल असे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटले आहे.
 
हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये अक्षयने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो ‘मिशन मंगल’ या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे. भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच पासूनच जोरदार चर्चेत होता.