सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अक्षय कुमारसोबत पावसात रोमांस करेल कॅटरीना कैफ, रीक्रिएट होईल गाणं

अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ लवकरच रोहित शेट्टीच्या चित्रपट 'सूर्यवंशी' यात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय अॅक्‍शन अवतारामध्ये दिसणार. तसेच चाहत्यांसाठी एक चित्रपटात एक आणखी सरप्राइज आहे. 
 
बातमीप्रमाणे यात अक्षय कुमार आणि रवीना टंडन अभिनित सिनेमा 'मोहरा' चं सुपरहिट गाणं 'टिप टिप बरसा पानी' ला रीक्रिएट केलं जाईल. हे गाणं त्या काळात खूप गाजलं होतं आणि यात अक्षय- रवीनाची केमेस्ट्री देखील कमालची होती.
 
रिपोर्टप्रमाणे रोहित शेट्टीने या गाण्याचे राइट्स खरेदी केले आहे. ओरिजनल गाण्याप्रमाणेच या गाण्यासाठी कॅटरीनाला पिवळ्या रंगाच्या शिफॉनच्या साडीत कास्ट केलं जाईल. कारण रवीनाने 25 वर्षांपूर्वीच अशाच प्रकारच्या यलो साडीत या गाण्यावर डांस केला होता.
सूत्रांप्रमाणे फराह खान हे कोरियोग्रॉफ करेल. काही दिवसांपासून याची सूर्यवंशी चित्रपटाची शूटिंग बँकॉकमध्ये सुरू होती. तेथे काही अॅक्शन सीन शूट करण्यात आले आहे.
 
या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत असून अभिमन्यू सिंह यात खलनायकाच्या भूमिकेत आहे. चित्रपटात नीना गुप्ता देखील दिसणार आहे. सूत्रांप्रमाणे नीना गुप्ता अक्षयच्या आईच्या भूमिकेत असेल.