शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

कॅटरीना कैफला मोदीसह या तीन लोकांसोबत जायचंय डिनर डेटला

बॉलीवूडमधील अनेक कलाकार पंतप्रधान मोदींचे चाहते आहे. पीएम मोदींना भेटण्याची संधी कोणीही सोडत नाही. मोदी देखील अगदी मनमोकळेपणाने कलाकारांची भेट घेतात. आता कॅटरीना कैफने पीएम मोदींसोबत डिनर डेटवर जायची इच्छा दर्शवली आहे.
 
भारत या चित्रपटाचे कलाकार सलमान खान आणि कॅटरीना कैफ हल्ली 'भारत' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान कॅटरीनला विचारण्यात आले की तिला कोणासोबत डिनरवर जायला आवडेल तर तिने तीन नावे घेतली. ज्यात सलमानचे नाव नव्हते.
 
कॅटरीना म्हणाली की तिला फॉर्मर यूनाइटेड स्टेट सेक्रेटरी कोंडोलिजा राइझ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकन अभिनेत्री मर्लिन मुनरो यांच्यासोबत डिनर करायला आवडेल.
 
आणि हाच प्रश्न सलमानला विचारल्यावर त्याने मजाकीत गोष्ट टाळून दिली की मला कोणासोबत जायचे नाही. त्याने हसत म्हटले की आय मी आणि मायसेल्फ. बाहेर डिनरवर जाण्यापेक्षा मला कुटुंबासह बसून डिनर करायला अधिक आवडेल असे सलमानने म्हटले.