गुरूवार, 2 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सलमान खानसोबत बिग बॉस 13 होस्ट करू शकते त्यांची फेव्हरेट अॅक्ट्रेस

Bigg Boss season 13
पॉप्युलर टीव्ही शो 'बिग बॉस' सीझन 13 लवकरच सुरू होणार असून याची तयारी सुरू झाली आहे. नेहमी प्रमाणे शो होस्ट करणारे सलमान खान यंदा यात काही बदल करू इच्छित आहे.
 
आधी कॉमनर्सचा कॉन्सेप्ट समाप्त केल्या जाण्याची चर्चा होती. आता या शो संबंधित नवीन चर्चा होत आहे की यंदा सलमान एकटे शो होस्ट करणार नाही तर त्यांच्यासोबत एक सुंदरशी अभिनेत्री देखील असेल. 
 
नावीन्यासाठी सलमानला यात बदल करण्याची इच्छा आहे आणि मेकर्सला ते एक फीमेल होस्ट ठेवण्याबाबत सल्ला देत आहे. दुसरी होस्टच्या रूपात कॅटरीना कैफ आणि आलिया भट या दोघींच्या नावाची चर्चा आहे. अजून ही गोष्ट कन्फर्म नसून कोणालाही फायनल केलेले नाही.
 
बातमीनुसार सलमानने मेकर्सला हा आयडिया दिला आहे ज्यानेकरुन शो मध्ये फ्रेशनेस जाणवेल. तरी याबद्दल ऑफिशियल अनाउंसमेंट झालेली नाही.