शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रणबीरसोबत ब्रेकअपनंतर खूप रडायची कॅटरीना, नेहमी राहायची उदास

बॉलीवूड कलाकार रणबीर कपूर सध्या आलिया भट्टसोबत रिलेशनमध्ये असले तरी त्याचे अफेयर यापूर्वी अनेक नायिकांसोबत होते. त्यातून दीपिका पादुकोण आणि कॅटरीना हे दोन मुख्य नावे आहेत. ब्रेकअपनंतर तिची काय अवस्था झाली होती यावर अलीकडेच कॅटरीनाने रहस्य उघडले.
 
आपल्या खासगी जीवनाबद्दल सांगत कॅटरीनाने सांगितले की रणबीरसोबत ब्रेकअपनंतर तिच्या खासगी आणि प्रोफेशनल जीवनात खूप परिवर्तन झाले. रिलेशनशिप संपल्यावर स्वत:ला समजणे आणि पुढचा विचार करण्यासाठी मी बाध्य झाले. जे घडायचे होते घडले आणि त्यामागे कारण असतात.
 
'बार बार देखो' या चित्रपटाची शूटिंग करताना मी खूप परेशान होते. तो काळ वाईट होता. कोणी आपल्याला अडचणीत कसं टाकू शकतो हा विचार करून हैराण होते. त्या काळात खूप शिकले, आणि व्यक्ती कशा प्रकारे पुढे वाढू शकतो हे समजण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काही गोष्टी उदास करायचा पण आता सर्व सुरळीत आहे. 
 
कॅटरीनाने म्हटले की एकदा तर योगा टीचरने मला विचारले सर्व बरयं ना? तेव्हा स्वत:वरचा ताबा सुटला आणि माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. 
 
कॅटरीना आणि रणबीर रिलेशनमध्ये असताना काही दिवस लिव्ह-इन मध्ये होते पण आता वेगळे झाले आहेत. रणबीर पूर्वी दीपिकाला देखील डेट करून चुकले आहे. आणि दीपिकाने देखील रणबीर गेल्यावर तिची काय स्थिती झाली होती हे सार्वजनिकपणे स्वीकारले होते. 
 
कॅटरीना आता सलमानसोबत 'भारत' या चित्रपटात दिसणार. 5 जून रोजी सिनेमा रिलीज होणार असून यात जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर, दिशा पाटनी आणि तब्बू देखील आहेत.