शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 29 एप्रिल 2019 (11:50 IST)

'ब्रह्मास्त्र' पुढील वर्षी होणार प्रदर्शित

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'ब्रह्मास्त्र' या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता आणखी पुढे ढकलण्यात आली आहे. धर्मा प्रॉडक्शनच्यावतीने दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी ही माहिती दिली. त्या नुसार आता हा चित्रपट थेट पुढच्याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.
 
अयान मुखर्जींनी दिलेल्या माहितीनुसार, 2020च्या उन्हाळ्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, याची नेमकी तारीख अजून जाहीर केलेली नाही. चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्‌स संदर्भातील काही कामे अर्धवट राहिली आहेत त्यामुळे ह्या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर गेले आहे.