शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 28 मार्च 2019 (07:09 IST)

‘या’सिनेमात साकारणार रणबीर कपूर डबल रोल

बॉलीवूडमधील रॉकस्टार रणबीर कपूर याने आपल्या सिनेक्षेत्रातील कारकिर्दीत अद्याप एकदाही डबल रोल ची भूमिका केली नाही. पण आता लवकरच तो आपल्या आगामी सिनेमात डबल रोल साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.
 
रणबीर कपूर आपल्या आगामी शमशेरा या सिनेमात डबल रोल ची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात तो एका डाकूची भूमिका साकारणार आहे. सिनेमात रणबीर वडील आणि मुलगा अशा भूमिका स्वत च साकारत आहे. सिनेमाचं दिग्दर्शनांची जबाबदारी करण मल्होत्रा पार पाडणार आहे. याआधी करण मल्होत्रा यांनी अग्निपथ या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.
 
शमशेरा या सिनेमाची कथा ब्रिटिशाचे राज्य असतानाची आहे. या सिनेमात एक डाकू कशाप्रकारे भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत भाग घेतो आणि आपल्या हक्कासाठी लढतो हे दाखविण्यात येणार आहे.
 
शमशेरा या सिनेमात रणबीर यांच्याशिवाय संजय दत्त आणि वाणी कपूर हे सुध्दा महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी 30 जुलै ला प्रदर्शित होईल अशी माहिती मिळत आहे.