सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मार्च 2019 (08:24 IST)

‘केसरी’ची बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई

अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘केसरी’चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच आठवड्यात बक्कळ कमाई केली आहे. जवळपास ७० कोटींहून अधिकचा गल्ला ४ दिवसांत या चित्रपटानं कमावला आहे.
 
धूलिवंदनला देशभरातील ३ हजार ६०० स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी २१ कोटींची कमाई या चित्रपटानं केली. तर चार दिवसांत ७८ कोटी या चित्रपटानं कमावले. मात्र आता आयपीएलला सुरुवात झाली आहे अशा वेळी चित्रपटाच्या कमाईला फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. शनिवारी चित्रपटाची कमाई ही १८ कोटी होती तर रविवारी कमाईच्या आकड्यात वाढ झालेली दिसून आली. रविवारी २१.५१ कोटींची कमाई ‘केसरी’नं केली आहे.