शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2019 (11:01 IST)

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...!

बॉलिवूडचे 'लव्ह बर्डस्‌' रणबीर कपूर व आलिया भट्ट यांचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही आणि कदाचित यापुढे दोघेही ते लपवण्याच्या मूडमध्ये नाहीत. काल रात्री जे काही दिसले त्यावरून तरी हेच म्हणता येईल. होय, काल झी सिनेमा अ‍ॅवॉर्ड शोमध्ये रणबीर व आलिया दोघांनीही हजेरी लावली. शोमध्ये दोघांनीही धम्माल मस्ती केली आणि शो संपल्यानंतर हे कपल अगदी हातात हात घालून 'खुल्लम खुल्ला' बाहेर पडताना दिसले. शो संपल्यानंतर रणबीर व आलिया दोघेही एकाच वेळी बाहेर पडले. यावेळी रणबीरने आलियाचा हात घट्ट पकडला होता. मीडियाच्या नजरा आपल्याकडे आहेत, हे दोघांनाही ठाऊक होते. पण त्यांना त्याची जराही पर्वा नव्हती. दोघेही गर्दीतून एकमेकांच्या हातात हात घालून गर्दीतून वाट काढताना दिसले आणि एकाच गाडीतून रवाना झालेत. तूर्तास दोघांचेही हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांत रणबीर व आलिया दोघांच्याही कुटुंबात कमालीची जवळीक पाहायला मिळतेय. आलिया व रणबीर रिलेशनशिपमध्ये असल्याचे खुद्द आलियाचे डॅडी महेश भट्ट यांनीही मान्य केले आहे. आलिया व रणबीर लवकरच लग्न करणार, असेही मानले जात आहे. अमेरिकेत उपचार घेत असलेले रणबीरचे डॅड ऋषी कपूर यांना रणबीर व आलियाच्या लग्नाची घाई झाली आहे. लेकाचे लवकरात लवकर दोनाचे चार हात व्हावेत, याबद्दल ते आग्रही आहेत. ऋषी कपूर येत्या काही दिवसांत भारतात परतणार आहेत.