मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मार्च 2019 (14:26 IST)

सोशल मीडियावर 'छपाक' च्या पहिल्या लूकची चर्चा

भिनेत्री दीपिका पादुकोनचा 'छपाक' चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. मेकअपच्या माध्यमातून हूबेहूब लक्ष्मी अग्रवालच्या चेहरेपट्टीतील अनेक बारकावे दीपिकाच्या चेहऱ्यावर साकारण्यात आले आहेत. दीपिकाच्या या लूकची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.  

'छपाक’मध्ये दीपिका साकारत असणाऱ्या पात्राचे नाव ‘मालती’ आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी, म्हणजेच १० जानेवारी २०२० ला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.