सोमवार, 1 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2019 (15:53 IST)

कलाकारांचा रंगोत्सव

Artist's Celebration of holi
आनंदाचा आणि रंगांचा म्हणून ओळखला जाणारा 'धुळवड' हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा झाला. हा 'रंगोत्सव' साजरा करताना कलाकार सुद्धा मागे नव्हते. दादरच्या बी.एम.सी मैदानावर 'रंगकर्मी होळी उत्सवाचे' आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात संपूर्ण मराठी कलाकारांनी उत्साहाने सहभागी होत अतिशय जल्लोषात धुळवड साजरी केली.

यावेळी मराठी प्रिंट मीडिया, चॅनेल मीडिया मधील सर्व पत्रकार सुद्धा अगदी जोशात रंग खेळताना दिसले. या रंगोत्सवात चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर, समीर चौगुले, सविता मालपेकर, स्वप्निल बांदोडकर, सुशांत शेलार, जितेंद्र जोशी, किशोरी शहाणे, फुलवा खामकर, अमृता संत, विजय पाटकर, अवधूत गुप्ते, जयवंत वाडकर, ऋजुता देखमुख, संग्राम साळवी, शैलेंद्र दातार, नेहा शितोळे, माधव देवचक्के, अमेय खोपकर, आरोह वेलणकर हे सर्व मराठी कलाकार रंगात न्हाहून निघाले. या 'रंगकर्मी होळी उत्सवाचे आयोजन' श्रीरंग गोडबोले, अमेय खोपकर, अभिजित पानसे, अवधूत गुप्ते, सुशांत शेलार, जयवंत वाडकर, पुष्कर शोत्री, स्मिता तांबे, सायली संजीव, अमित फाळके, अवधूत वाडकर, मंदार वाडकर' यांनी केले होते.