गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2019 (11:59 IST)

'धुमस' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अ‍ॅक्शन, रोमान्स आणि रोमंटिक गाणी असलेल्या बहुचर्चित 'धुमस' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबई येथे जलसंधारणंत्री राम  शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी दिग्दर्शक शिवाजी दोलताडे, माजी आमदार आनंदकुमार पाटील, बाळासाहेब बंडगर, जीवन जानकर, संतोष पाटील यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. लोकप्रिय नेते उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर हे 'धुस' या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनयात पदार्पण करत आहेत. जानकर आणि पडळकर या चित्रपटात अभिनेत्याच्या रूपानेसुद्धा सर्वसामान्य जनतेवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना दिसणार आहेत. तसेच गोपीचंद -साक्षी चौधरी आणि रोहन पाटील-कृतिका गायकवाड या दोन जोड्यांची रोमंटिक केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला भिडते. याशिवाय विशाल निक, भारत गणेशपुरे, कलाकर सातपुते, अनिल नगरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका 'धुमस' मध्ये आहेत. यावेळी राम शिंदे म्हणाले, आपले नेतृत्व कुठेही कमी पडत नाही याची जाणीव समर्थकांना झाल्याशिवाय नेतृत्व उभं राहू शकत नाही. समाजाची भावना मांडणारा व उपेक्षित घटकांना न्याय देऊ पाहाणारा 'धुमस' हा एक वेगळा सिनेमा आहे. जानकर म्हणाले, राज्यभर फिरत असताना समाजाची अवस्था मी जवळून बघितली. ती मांडण्यासाठी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपट हे माध्यम योग्य आहे असे आम्हाला वाटले. 'धुमस' ही काळजातून आलेली कलाकृती आहे. चित्रपटासाठी गीतलेखन अविनाश काले यांनी केले असून पी. शंकर यांचे संगीत लाभले आहे. या गीतांना सोनू निगम, श्रेया घोषाल, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, दिव्य कुमार, वैशाली माडे, कविता राम यांचा स्वरसाज लाभला आहे. हा चित्रपट 29 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.