गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. आगामी चित्रपट
Written By
Last Modified सोमवार, 22 एप्रिल 2019 (18:24 IST)

सलमान खान अभिनित 'भारत' चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानची मचअवेटेड 'भारत' या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. फॅन्स आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहे. नुकत्याच प्रदर्शित ट्रेलरमध्ये चित्रपटाची संपूर्ण कथा दर्शविली गेली आहे.
 
3.11-मिनिटाच्या या ट्रेलरची सुरुवात देशाच्या प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या डायलॉगने होते. त्यानंतर ट्रेलरमध्ये सलमान स्वत: ला एक मध्यमवर्गीय वृद्ध माणूस असल्याचे सांगत म्हणतो, जितके पांढरे केस माझ्या डोक्यात आणि दाढीत आहे माझं आयुष्य त्यापेक्षा अधिक रंगीन राहिले आहे. ट्रेलरचा प्रभाव जोरदार दिसत आहे.
 
सलमान खान संपूर्ण ट्रेलरमध्ये दिसतोय. त्याच्या व्यतिरिक्त कॅटरीना कैफ, दिशा पाटनी, सुनील ग्रोव्हर आणि जॅकी श्रॉफ देखील या चित्रपटातील महत्त्वाचे भाग आहे. सलमान खान आणि कॅटरीना कैफची रोमँटिक केमिस्ट्री देखील ट्रेलरमध्ये दिसून येते. कॅटरीना कैफ त्याची 'मॅडम सर' बनली आहे. चित्रपटाच्या रिलीज केलेल्या पोस्टर्समधून दिशा पाटनी गायब होती पण ट्रेलरमध्ये ती सुरुवातीलाच दिसते. सिनेमातील सलमानचे नाव भारत आहे आणि तो यासह कोणतीही सरनेम न वापरण्याचे कारण देखील सांगतो. ट्रेलरमध्ये सलमान खानचे अनेक रूप दाखविण्यात आले आहे. 
 
ट्रेलर लोकांना खूप आवडले असून येत्याक्षणी ते व्हायरल देखील झाले आहे. अली अब्बास जफर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. 5 जून 2019 रोजी भारत रिलीज होणार आहे.