मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 एप्रिल 2019 (14:02 IST)

मधुर भंडारकरचा चित्रपट गालिबमध्ये काम करणार आहे शाहरुख खान?

फिल्म अभिनेता शाहरुख खानबद्दल आता कल्पना चालू आहे की तो चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकराच्या पुढील चित्रपटात दिसू शकतो. महत्त्वाचे म्हणजे शाहरुख खानचे जिरो चित्रपट रिलीज होण्याअगोदर तो राकेश शर्माची बायोपिक 'सारे जहां से अच्छा' मध्ये काम करणार होता पण जिरो फ्लॉप झाल्यानंतर त्याने स्वत: ला या चित्रपटापासून वेगळे केले. यानंतर अशा बातम्या देखील आल्या की त्याने डॉन फ्रेंचाइझीपासून देखील स्वत: ला दूर केले आहे आणि आता रणवीर सिंगने त्याची जागा घेतली आहे पण फरहान अख्तर आणि जोआ अख्तरने अफवा म्हणून या बातमीचे स्पष्टीकरण दिले आहे.
 
आता अशी बातमी आहे की शाहरुख खान राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्या पुढील चित्रपटामध्ये काम करू शकतो. असेही म्हटले जात आहे की त्याने या चित्रपटासाठी होकार देखील दिला आहे. सध्या कोणीही अधिकृतपणे याची पुष्टी नाही केली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात मधुर भंडारकरने म्हटले जरूर आहे की ते गालिबवर काम करीत आहे पण त्यांनी देखील अभिनेत्याचे नाव उघड नाही केले.
 
यावेळी शाहरुख खान चीनमध्ये असून त्याने आपल्या आगामी चित्रपटाविषयी सांगितले की तो जूनमध्ये चित्रपटाबद्दल मोठा निर्णय घेऊ शकतो. असा विचार केला जात आहे की हा चित्रपट मधुर भंडारकरचा गालिबच आहे.