शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2019 (09:10 IST)

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण

MNS workers
महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याआधीही मनसेविरोधात पोस्ट टाकणाऱ्या अनेकांना अशाप्रकारे मारहाण करण्यात आली आहे. 
 
काही दिवसांपूर्वी दादरच्या शिवाजी पार्क येथे गुढीपाडवा मेळाव्याचे मनसेतर्फे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त शिवाजी पार्क येथे जमावे असे लोकांना मनसेच्या फेसबुक पेजवर आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला मनसेच्या कार्यकर्त्यांसह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.