रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 एप्रिल 2019 (09:29 IST)

मुंबईकर घामाघूम, उकाडा वाढला

मुंबईत उकाडा वाढला आहे. मुंबईचे सोमवारचे कमाल तापमान 33.5 अंश सेल्सिअस तर आर्द्रता ८९ टक्के नोंदविण्यात आली. कमाल तापमानाची सरासरी आणि आर्द्रतेमध्ये होणारी वाढ येथील उकाड्यात भर घालत असून, कडाक्याच्या उन्हामुळे घामाघूम मुंबईकर बेजार होऊ लागले आहेत. दरम्यान, राज्यातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.
 
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली. तर, राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.