काजोल-अजय येणार परत रुपेरी पडद्यावर?
बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी अजय देवगण आणि काजोल यांची जोडी पुन्हा एकदा मोठया पडद्यावर आणणार असल्याचे सांगितले आहे. अनीज बज्मी यांनी अजय-काजोल यांच्यासोबत “प्यार तो होना ही था’मध्ये एकत्रितपणे काम केले होते. त्यावेळी दोन्ही कलाकारांसोबत काम करण्याचा चांगला अनुभव होता, असे सांगत बज्मी म्हणाले एका चांगल्या स्क्रिप्टमधून या जोडीला पुन्हा एकत्रित आणणार आहे.
बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलेले अनीस बज्मी सध्या त्यांच्या आगामी “पागलपंती’चित्रपटात व्यस्त आहेत. या चित्रपटात जॉन अब्राहम, अनिल कपूर, इलियाना डिक्रूज, अरशद वारसी, पुलकित सम्राट, कृति खरबंदा, उर्वशी रौतेला आणि सौरभ शुक्ला काम करित आहेत.
दरम्यान, अजय देवगण आणि काजोल यांच्या नवीन प्रॉजेक्टबाबत सांगायचे झाल्यास हे दोघेजण पुढील वर्षी जानेवारीत प्रदर्शित होणा-या “तानाजी द अनसंग वॉरियर’मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण आणि भूषण कुमार करत आहे. अजय आणि काजोल यांनी 1999मध्ये लग्न केले होते.