बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 20 एप्रिल 2019 (17:02 IST)

‘हाऊज द जोश’ डायलॉग फेम उरीतील अभिनेत्याचा भीषण अपघात

‘उरी’ या सर्जिकल स्ट्राईक वर आधारित असलेल्या सिनेमात ‘हाऊज द जोश’ डायलॉगने प्रसिद्ध झालेला अभिनेता विकी कौशलचा भीषण अपघात झाला असून, सिनेमाच्या शूटिंग दरम्यान गुजरातमध्ये हा अपघात झाला आहे. यात विकी कौशलला त्याच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. दिग्दर्शक भानू प्रताप सिंग यांच्या हॉरर सिनेमासाठी अभिनेता विकी कौशल काम करत आहे. या चित्रपटाचे शुटींग गुजरातमध्ये सुरु आहे. शुटींग वेळी अॅक्शन सीनदरम्यान विकी कौशलचा अपघात झाला. 
 
या अपघातामुळे विकी कौशलच्या गालाच्या हाडाला दुखापत झाली. विकी कौशलच्या चेहऱ्यावर 13 टाके पडले आहेत. सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. भानू प्रताप सिंग दिग्दर्शन करत असलेल्या हॉरर सिनेमात धावत जाऊन दरवाजा उघडायचा, असा सीन विकीला करायचा होता. त्यावेळी दरवाजा विकीच्या चेहऱ्यावर पडला आणि त्यात त्याला दुखापत झाली. या अपघातानंतर विकीला तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उरी चित्रपटाने विकिला अफाट लोकप्रियता दिली आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.