गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 6 एप्रिल 2019 (08:40 IST)

अभिनेत्री मयुरी कांगो आठवतेय का ? ती झाली गुगल इंडियाच्या इंडस्ट्री हेड

नव्वदच्या  दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी कांगो यांची गुगल इंडियाच्या इंडस्ट्री हेड म्हणून नियुक्ती झाली आहे. मयुरी यांनी ‘पापा कहते है’,‘होगी प्यार की जीत’यांसारख्या चित्रपटात काम केले असून ‘घर से निकलते ही…कुछ देर चलते ही’हे त्यांचे प्रसिद्ध गाणे आहे. 
 
मयुरी यांनी नुकताच गुगल इंडियामध्ये इंडस्ट्री हेड म्हणून 4 एप्रिल 2019 रोजी पदभार स्विकारला आहे. या आगोदर मयुरी परफोर्मिक्स रिझल्टट्रिक्स (Performix Resultrix)या डिजीटल मार्केटिंग एजेन्सीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत होत्या. सोबतच त्यांनी नेस्ले, उबर, एअरटेल यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांमध्येही काम केले आहे. मयुरी यांची  गुगल इंडियाच्या इंडस्ट्री हेड म्हणून नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे मूळ गाव औरंगाबादमधून  कौतुक होत आहे.मयुरी यांनी अमेरिकेतून मार्केटिंग आणि फायनान्स विषयात एमबीएची पदवी घेतली आहे. मयुरी कांगो या कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो आणि रंगकर्मी सुजाता कांगो यांची मुलगी आहे.