मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: बुधवार, 1 ऑक्टोबर 2025 (07:30 IST)

Sharadiya Navratri 2025 प्राचीन जागृत श्री भवानी देवी मंदिर

Shri bhavani mata temple nashirabad
Maharashtra Tourism : नवरात्रीचे पवित्र पर्व सुरू आहे. अनेक भक्त आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जात असतात. व भारत देशात अनेक प्राचीन जागृत असे देवी मंदिरे असून त्यांचे आपले काही खास वैशिष्ट्ये आहे. तसेच आज आपण एका देवीच्या मंदिर बद्दल जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद गावात देवी आईचे प्राचीन जागृत श्री भवानी देवी मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास अतिशय प्राचीन असून हे मंदिर देखील जागृत आहे. 
वैशिष्ट्ये- 
भवानी देवी मंदिर हे जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद गावात वसलेले आहे. नशिराबाद हे जळगावपासून १० किमी अंतरावर आहे. हे शहर राष्ट्रीय महामार्ग ६ वर आहे, ज्यामुळे प्रवास सोपा आहे.
इतिहास 
नशिराबाद हे ऐतिहासिक शहर असून ज्याचे प्राचीन नाव 'सोलनिंभोर' होते, असे नाव असल्याचे कारण म्हणजे येतेच १६ हनुमान मंदिरे आणि १६ मुख्य दरवाजे होते. हे शहर मूळतः नासिरुद्दीन बादशहा यांच्या नावाने नशिराबाद म्हणून ओळखले जाते. तसेच भवानी देवी मंदिराचा नेमका इतिहास उपलब्ध नसला तरी, नशिराबादमधील इतर मंदिरांप्रमाणे हे मंदिर देखील स्थानिक धार्मिक परंपरेचा भाग आहे. हे मंदिर देवी भवानीला समर्पित असून आणि स्थानिक भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात असलेले नशिराबाद हे गाव काचेच्या बांगड्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असले तरी धार्मिकदृष्ट्या हनुमान आणि इतर देवतांच्या मंदिरांसाठी ओळखले जाते, ज्यात भवानी मंदिराचा समावेश होतो.
तसेच मंदिराची रचना साधी आणि पारंपरिक असून ज्यात दगडी बांधकाम आणि स्थानिक शैलीतील कोरीव काम दिसते. गर्भगृहात देवी भवानीची प्राचीन आणि प्रसन्न अशी मूर्ती आहे, जी भक्तांना संकटमोचन आणि शक्ती प्रदान करते अशी श्रद्धा आहे. नवरात्रीच्या काळात येथे विशेष पूजा, आरती आणि जत्रा आयोजित केली जाते. स्थानिक भक्त आणि जवळपासच्या गावांमधून गर्दी होते. तसेच भवानी देवी ही शक्ती देवता मानली जाते आणि स्थानिक कुटुंबांसाठी कुलदेवता आहे. भक्त संकटनिवारण, आरोग्य आणि समृद्धीसाठी येथे प्रार्थना करतात.
प्राचीन जागृत श्री भवानी देवी मंदिर नशिराबाद जावे कसे? 
रेल्वे मार्ग- नशिराबाद या गावापासून भादली हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. व जळगाव जंक्शनपासून १० किमी अंतरावर आहे. स्थानिक बस किंवा रिक्षा यांच्या मदतीने नशिराबाद मध्ये सहज पोहचता येते. 
रस्ता मार्ग- नशिराबाद हे गाव नॅशनल हायवे ६ वर असून  MSRTC बस किंवा खासगी वाहन उपलब्ध आहे. 
विमान मार्ग-मंदिरापासून जवळचे विमानतळ हे जळगाव विमानतळ आहे जे १० किमी अंतरावर आहे. तसेच औरंगाबाद विमानतळ १५० किमी विमानतळ आहे.