आदिशक्ती चंडिकादेवी मंदिर पाटणादेवी चाळीसगाव
Maharashtra Tourism : पाटणादेवी हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एक प्रसिद्ध शक्तीपीठ आहे. हे आदिशक्ती चंडिकादेवीचे प्राचीन मंदिर म्हणून ओळखले जाते आणि निसर्गरम्य गौताळा अभयारण्याच्या परिसरात वसलेले आहे.
पाटणादेवी हे धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचे अनोखे मिश्रण असून चाळीसगाव शहरापासून अवघ्या १८ किमी अंतरावर नैऋत्य दिशेला असलेले हे ठिकाण भक्तांसाठी तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
इतिहास-
हे मंदिर सुमारे १,००० वर्ष जुने मानले जाते. तसेच हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधले गेले असून संपूर्णपणे काळ्या पाषाणात बांधलेल्या या मंदिराची स्वयंभू मूर्ती पाटण गावाच्या नावाशी जोडली जाते. तसेच एका कथेनुसार, भगवतीने एका भक्ताला कुंडात स्नान करून स्वयंभू मूर्ती मिळवण्यास सांगितले. गोविंद स्वामी यांनी ही मूर्ती मंदिरात स्थापित केली.
भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला असे सांगितले जाते की, तो पाटण आजचे पाटणादेवी येथे लावला. येथे त्यांच्या नावाचा शिलालेखही आहे. तसेच मंदिर परिसरात कालिका देवीचे मंदिर आहे. जवळच महादेव मंदिर आणि वाल्मिकी ऋषीचे मंदिर आहे.
उत्सव-
पाटणादेवी येथे शारदीय नवरात्रात मोठ्या थाटाने साजरा होतो. भक्तीमय वातावरण, जत्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तसेच सह्याद्रीच्या पायथ्याशी, हिरवीगार वनराई आणि शांत वातावरण यामुळे हे मंदिर पर्यटकांना आकर्षित करते.
पाटणादेवी चाळीसगाव जावे कसे?
रेल्वे मार्ग-चाळीसगाव हे मध्य रेल्वेचे मुंबई-भुसावळ मार्गावरील प्रमुख जंक्शन असून स्टेशनवरून स्थानिक वाहनाच्या मदतीने मंदिरापर्यंत पोहचता येते.
रस्ता मार्ग-चाळीसगाव एसटी स्टँडवरून सकाळपासून प्रत्येक तासाला पाटणादेवीच्या बसेस उपलब्ध असतात. तसेच खासगी वाहनाच्या मदतीने देखील मंदिरापर्यंत पोहचता येते.