Sharadiya Navratri 2025 जागृत श्री चतुरशृंगी देवी मंदिर पुणे
Maharashtra Tourism : महाराष्ट्र देवीचे अनेक प्राचीन मंदिरे आहे. पत्येक मंदिराचे काही खास वैशिष्ट्ये आहे. तसेच नवरात्री सुरु असून अनेक भक्त देवीच्या दर्शनाला जातात. तुम्ही देखील पुण्यातील या जागृत देवस्थानाला नक्कीच भेट देऊ शकतात. पुणे शहरातील सेनापती बापट रस्त्यावर, चतुरशृंगी टेकडीवर वसलेले चतुरशृंगी मंदिर देवीचे मंदिर हे अत्यंत जागृत देवस्थान आहे. तसेच हे मंदिर पुण्यातील एक प्रमुख धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे.
चतुरशृंगी मंदिराचा इतिहास
चतुरशृंगी मंदिराची स्थापना १७व्या शतकात झाली असावी, असे मानले जाते. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे मंदिर बांधले गेले किंवा त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कथेनुसार, एका व्यापाऱ्याने देवी चतुरशृंगीच्या दर्शनाने संकटातून मुक्ती मिळाल्याने हे मंदिर बांधले. मंदिराचे नाव 'चतुरशृंगी' (चार चोट्या) टेकडीच्या चार शिखरांवरून पडले आहे. मंदिराचा इतिहास मराठा काळाशी जोडला गेला असून, पेशव्यांच्या काळातही येथे विशेष पूजा आणि उत्सव आयोजित केले जात.
वैशिष्ट्ये-
मंदिराची रचना पारंपरिक मराठा शैलीत आहे, ज्यात दगडी बांधकाम आणि कोरीव काम दिसते. गर्भगृहात देवी चतुरशृंगीची (महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि अष्टभुजा गणपती) सुंदर मूर्ती आहे. मंदिरात १०० पायऱ्या चढून जावे लागते, ज्यामुळे टेकडीवरील स्थान अधिक रमणीय वाटते. नवरात्रीच्या काळात येथे भव्य उत्सव साजरा केला जातो. लाखो भक्त दर्शनासाठी येतात, आणि रात्रीच्या वेळी विशेष आरती, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मंदिर टेकडीवर असल्याने येथून पुणे शहराचे विहंगम दृश्य दिसते. मंदिर परिसरात छोटी बाग आणि विश्रामस्थळे आहे. तसेच चतुरशृंगी देवी ही पुण्याची ग्रामदेवता मानली जाते आणि स्थानिकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. मंदिराला भक्त संकटनिवारण, समृद्धी आणि यशासाठी प्रार्थना करण्यासाठी येतात. नवरात्रीच्या वेळी येथे आयोजित होणारी जत्रा आणि धार्मिक मिरवणूक प्रसिद्ध आहे.
चतुरशृंगी मंदिर पुणे जावे कसे?
रेल्वे मार्ग- पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनपासून मंदिर ६ किमी अंतरावर आहे. ऑटोरिक्षा, टॅक्सी किंवा स्थानिक बसने मंदिरापर्यंत सहज पोहोचता येते. तसेच शिवाजी नगर रेल्वे स्थानक ,खडकी रेल्वे स्थानक,आणि दापोडी रेल्वे स्थानक येथून जवळ आहे.
रस्ता मार्ग- पुणे शहरातील जवळजवळ सर्व भागातून सेनापती बापट रस्त्यामार्गे मंदिरापर्यंत रस्त्याने साजह पोहचता येते. तसेच बस मार्गे-मुंबईपासून दररोज मंदिरापर्यंत येण्यासाठी बऱ्याच बसेस आहे.आपण सातारा, रायगड आणि अहमदनगर वरून देखील बसने येऊ शकता.
विमान मार्ग-पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ पासून मंदिर सुमारे १५ किमी अंतरावर आहे. टॅक्सी किंवा कॅबने मंदिरापर्यंत पोहोचता येते.