गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2019 (12:06 IST)

वारणसी पोहचले मोदी, लोकसभेतील विजयानंतर आभार रॅली

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आपला मतदारसंघ वाराणसीत पोहोचले आहेत. येथे आभार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
 
नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी शहरात सर्वत्र सजावट करण्यात आली आहे. बाबतपुर एअरपोर्टावर यूपीचे राज्यपाल राम नाइक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदींचे स्वागत केले. फुलांच्या वर्षावसह मोदींचे स्वागत केले गेले. नंतर मोदींनी बाबा विश्वनाथ आणि कालभैरवाचं दर्शन घेतले. मोदींनी बाबा विश्वनाथ मंदिर पूजा-अर्चना केली.
 
लोकसभा निवडणुकीतील देदीप्यमान विजयानंतर नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा संपन्न होईल. यावेळी मंत्र्यांच्या शपथविधीदेखील पार पडेल. 
 
भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी त्यांचे नेते म्हणून एकमुखानं मोदींची निवड केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला 303, तर एनडीएला 353 जागा मिळाल्या आहेत.
 
30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद नरेंद्र मोदींना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील, अशी माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनादेखील शपथ दिली जाईल. 
 
वाराणसी दौर्‍यावर असताना मोदी आणि शहरातील जनता उत्साह आणि आनंदी वातावरण दिसून येत आहे.