सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2019 (10:25 IST)

बाप्परे, पोटातून काढले ८ चमचे, २ स्क्रू ड्रायव्हर, २ टूथब्रश बरेच काही

हिमाचल प्रदेशातल्या लाल बहादुर शास्त्री सरकारी रूग्णालयात पार पडलेल्या एका शस्त्रक्रियेत एका रूग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी चक्क ८ चमचे, २ स्क्रू ड्रायव्हर, २ टूथब्रश आणि स्वयंपाक घरात वापरातला १ चाकू बाहेर काढला आहे. 
 
सदरचा ३५ वर्षीय रूग्णाच्या  पोटातून हे सगळं बाहेर काढल्याने डॉक्टरांनी धक्का बसला आहे.या रूग्णाचे नाव काय ते समजू शकलेले नाही. आम्ही या रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. हा रूग्ण मानसिकदृष्ट्या आजारी आहे अशी माहिती रूग्णालयातले डॉक्टर निखिल यांनी दिली. आता या रूग्णाची प्रकृती स्थिर आहे. हा प्रकार दुर्मीळ आहे, मानसिक आजार असल्यामुळेच या रूग्णाने या वस्तू गिळल्या असेही डॉक्टर निखिल यांनी म्हटले आहे.