सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बुद्धिबळाचे खेळाडू अमित शहा यांची कमाल, जाणून घ्या त्यांच्या यशाबद्दल 5 गोष्टी

घरात चाणक्य यांचा फोटो : अमित शहा यांना भाजपचे चाणक्य असे म्हटलं जातं. ते स्वत: चाणक्याचे मोठे फॅन आहेत. त्याच्या घरात चाणक्यांचा फोटो देखील लागलेला आहे. चाणक्य यांच्यात खोल आवड आणि राजनयिक क्षमतेमुळे त्यांनी भारतीय राजकारणात ही जागा मिळवली आहे आणि 2019 च्या निवडणुकीत पक्षाला ऐतिहासिक यश मिळाले.
 
बुद्धिबळाचे खेळाडू : भाजप अध्यक्ष शहा यांना बुद्धिबळ खेळण्याचा शौक आहे. आपल्या या आवडीमुळे त्यांनी निवडणुका खेळाप्रमाणे समजले. त्यांनी बूथ ते निवडणुकीच्या मैदानापर्यंत प्रबंधन आणि प्रचार या प्रकारे नियोजित केले की विपक्षाचे मोठे मोठे खेळाडू देखील पराभूत झाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठीत पराभवाला सामोरं जावं लागलं. एवढेच नव्हे तर काँग्रेस अशा प्रत्येक ठिकाणून पराभूत झाली जेथून जिंकण्याची शक्यता शंभर टक्के असल्याचे मानले जात होते.
 
त्वरित निर्णय : अमित शहा एक महान रणनीतिकार आहे. ते परिस्थिती बघून ताबडतोब संयमित आणि त्वरित निर्णय घेण्यात सक्षम आहे. त्यांच्या क्षमतेमुळेच भाजपने अनेकदा आपली 
रणनीती बदलली आणि त्याचे परिणाम बघून राजकीय विश्लेषक देखील हैराण झाले. विकास याऐवजी राष्‍ट्रवादाला मुद्दा करणे हीच त्यांची मोठी भूमिका होती.
 
जोखीम घेण्यास घाबरत नाही : शहा यांची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ते जोखीम घेण्यात मुळीच घाबरत नाही. या निवडणुकांमध्ये देखील त्यांनी धोकादायक निर्णय घेतले. पक्षाने 75 प्लस चा फार्म्यूला अमलात आणून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन सह अनेक दिग्गज लोकांचे तिकिट कापले. अशा निर्णयामुळे पक्षाला नुकसान होईल असे वाटत होतं पण त्याच्या वाईट परिणाम पडला नाही.
 
लोकं आणि संधीबद्दल योग्य समज : शहा यांना लोकांची तशीच संधी साधून घेण्याची चांगली समज आहे. त्यांनी कैलाश विजयवर्गीय यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांना पश्चिम बंगालची जबाबदारी सोपवली आणि या कार्यासाठी पुरेसा वेळ देखील दिला. परिणामस्वरूप भाजपने येथे विजय मिळवला. असेच राजस्थानमध्ये बघायला मिळाले जेथे प्रकाश जावडेकर यांनी 3 महिन्यातच काँग्रेसचा प्रभाव नाहीसा करत तेथून काँग्रेसला साफ केले.