मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2019 (12:51 IST)

मोदींनी अडवाणी- जोशी यांच्याकडून आशीर्वाद घेतला

सतराव्या लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्याकडून आशीर्वाद घेतला. सकाळी साडे दहा वाजता पंतप्रधान मोदी आणि शहा अडवाणी यांच्या घरी पोहचले आणि पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल चर्चा केली. नंतर पंतप्रधान यांनी आपल्या ट्विटर हँडलवर भेट केल्याची एक फोटो शेअर केली आणि म्हटले की यांच्यामुळे पक्षाला ऐतिहासिक यश हाती लागले.
 
लाल कृष्ण अडवाणी यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत लिहिले की, 'आज अडवाणींची भेट घेतली. यांच्या सारख्या महान लोकांनी दशकांपर्यंत पक्षाचे निर्माण केले आणि पक्षाला एक नवीन विचारधारा प्रदान केल्यामुळेच भाजपसाठी यश गाठणे शक्य झाले आहे.'


मुरली मनोहर जोशी यांची घेतली भेट लालकृष्ण अडवाणी यांच्याशी भेट घेतल्यानंतर पीएम नरेंद्र मोदी वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्याकडे पोहचले. त्यांच्यासोबत भाजप अध्यक्ष अमित शहा देखील उपस्थित होते. मुरली मनोहर जोशी यांचे कौतुक करत मोदींनी लिहिले की 'डॉ. मुरली मनोहर जोशी एक विद्वान आणि बुद्धिजीवी आहे. भारतीय शिक्षणात सुधारणा करण्यात त्यांचा सहयोग उल्लेखनीय आहे. त्यांनी नेहमी पक्षाला मजबूत केले आणि माझ्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांना प्रोत्साहित देखील केले. आज सकाळी त्यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.