सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 23 मे 2019 (13:45 IST)

झारखंडमधील 14 पैकी 10 जागांवर भाजपला ‘लीड’

देशभरातील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून झारखंडतील 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून या 14 लोकसभा मतदारसंघातील सुरुवातीचे कल हाती आले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार झारखंडमध्ये मतमोजणीच्या सुरवातीला भाजपने मुसंडी मारल्याचे चित्र असून भाजप 10 जागांवर, काँग्रेस 3 जागांवर तर इतर एका जागेवर आघाडी घेताना दिसत आहे.