सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

पेरू दिसला तर मुलगा आणि भेंडी दिसली तर मुलगी

नि:संतान दंपती संतती सुखासाठी काय नाही करत, डॉक्टरांकडे चकरा लावतात किंवा मंदिरात जाऊन नवसही करतात. अश्याच एका मंदिरात महिला जमिनीवर झोपल्याने गर्भवती होतात. आश्चर्य वाटतं असलं तरी ही बाब प्रसिद्ध आहे की हिमाचल येथील सिमस गावातील मंदिरात देवीच्या आशीर्वादाने संतती प्राप्ती होते. येथे झोपण्यासाठी अनेक स्त्रिया लांब लांबहून येतात. 
 
हिमाचल प्रदेशाच्या मंडी जिल्ह्यातील हे सिमस गाव येथील प्राचीन सिमसा देवी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. नवरात्रीत येथे सलिन्दरा उत्सव साजरा केला जातो ज्याचा अर्थ आहे स्वप्नात येणे. या दरम्यान नि:संतान स्त्रिया दिवस-रात्र मंदिराच्या जमिनीवर झोपतात. अशाने त्या लवकर गर्भधारणा करतात असे मानले जाते. एवढेच नव्हे तर सिमसा देवी स्त्रियांना रात्री स्वप्न देऊन संकेत देते ज्याने मुलगा वा मुलगी हे माहीत पडतं असे मानले गेले आहे.
 
जर स्वप्नात महिलेला पेरू दिसला तर मुलगा आणि भेंडी दिसली तर मुलगी होण्याचे संकेत समजले जाते. स्वप्नात नि:संतान राहण्याचे संकेत मिळाल्यास ती स्त्री मंदिरातून गेली नाही तर तिला खाज सुटून शरीरावर लाल डाग पडू लागतात. भक्तिभावाने आलेल्या प्रत्येक स्त्रीला देवी मानव किंवा प्रतीक स्वरूपात दर्शन देऊन आशीर्वाद देते. स्वप्न फळ दिसणे म्हणजे पाळणा हालण्याचे संकेत असून स्वप्नात धातू किंवा लाकूड दिसणे अशुभ मानले जाते. 
 
म्हणतात की स्त्रीला स्वप्नात लाकूड, दगड किंवा धातू दिसल्यास ती आई होऊ शकत नाही असे संकेत आहे.