1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

कुटुंबातल्या तिसऱ्या मुलाचा मतदानाचा हक्क काढून घ्या - रामदेव बाबा

The third child of the family
देशातील वाढत्या लोकसंख्येवर उपाय म्हणून सरकारने कुटुंबातल्या तिसऱ्या मुलाला मतदानाचा अधिकार न देणारा कायदा संमत करावा. तसंच गोहत्या आणि दारूवर पूर्णत: बंदी घालावी, अशी मागणी रामदेव बाबा यांनी रविवारी केली आहे. 
 
"पुढील 50 वर्षांत भारताची लोकसंख्या 150 कोटींच्या पुढे जाता कामा नये. आपण त्याहून अधिक लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी तयार नाही आहोत. लोकसंख्येवर अंकुश लावायचा असल्यास तिसऱ्या अपत्याला मतदानाचा अधिकार नकारण्यासोबतच त्याला कोणत्याही सरकारी सुविधा-योजनेचा लाभ घेता येणार नाही, असा कायदा सरकारने मंजूर करायला हवा", असं रामदेव म्हणाले.
 
असं केलं तरच सर्व जाती-धर्मांचे नागरिक तिसऱ्या अपत्याला जन्म देण्याचे टाळतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.