शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 28 जानेवारी 2019 (11:01 IST)

मदर तेरेसांना भारतरत्न, मग हिंदू संतांना का नाही?

मदर तेरेसांना भारतरत्न मिळू शकतो कारण त्या ख्रिस्ती आहेत. मग स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती अशा अभूतपूर्व काम करणार्‍या हिंदू संतांना का मिळू शकत नाही? या देशात हिंदू असणे हा गुन्हा आहे का? असा सवाल योगगुरू आणि पतंजलीचे सर्वेसर्वा बाबा रामदेव यांनी उपस्थित केला आहे. आजपर्यंत एकाही हिंदू संताला भारतरत्न मिळाला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
 
गरीब, आजारांनी पिडलेल्या रुग्णांसाठी, अपंगांसाठी आणि अनाथांसाठी दर तेरेसा अखेरपर्यंत कार्य करत होता. यामुळेच 1997 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते. याच घटनेवर बोट ठेवते रामदेव बाबांनी प्रश्न उपस्थित केला आहे. डेहरादूनला एका कार्यक्रात ते म्हणाले, 70 वर्षांत एकाही संन्यासाला भारतरत्न मिळाला नाही.