1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 9 जानेवारी 2019 (09:05 IST)

राज ठाकरे यांचे व्यंगचित्र, मोदींवर टीका

Raj Thackeray's cartoon
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकाला आपआपली जागा दाखवली अशा आशयाचं मोदी सरकारला बोचणारं व्यंगचित्र राज ठाकरेंनी काढलं आहे. या व्यंगचित्रात आलोक वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ‘या वर्माजी बसा’ असं म्हणत असून त्यांना सीबीआय संचालकाच्या खुर्चीवर बसण्याची विनंती करताना दाखवण्यात आलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्मा यांच्या फेरनियुक्तीला विरोध करत असल्याचं दाखवण्यात आलं असून न्यायाधीशांच्या निर्णयानंतर मोदी केवळ न्यायाधीशांकडे आ वासून पाहात असल्याचं दिसतंय.