मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2019 (14:56 IST)

सोशल मीडियावर फार पसंत पडत आहे श्वेता बच्चनचे हे फोटो, जाणून घ्या काय आहे कारण

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन लाईम लाइटपासून नेहमी दूर राहते. पण सोशल मीडियावर नेहमी कोणते ना कोणते पोस्ट शेयर करत असते. नुकतेच श्वेताने जे फोटो शेअर केले, त्याला फार पसंत करण्यात येत आहे. या फोटोत श्वेता आपल्या दोन्ही मुलं अगस्त्य आणि नव्यासोबत दिसत आहे.
फोटोमध्ये श्वेताने ब्लॅक कपडे परिधान केले असून केस मोकळे सोडले आहे. तसेच नव्या स्वेट शर्ट आणि पैंट्स घालून आहे आणि अगस्त्य श्वेताच्या मागे बसला आहे.   या फोटोला शेअर करत श्वेता ने लिहिले, 'मिस यू मच स्वीटहार्ट्स.' अर्थातच ती तिच्या मुलांना फार मिस करत आहे.
नव्या न्यूयॉर्कच्या फोर्डम युनिव्हर्सिटीत अभ्यास करत आहे. तसेच अगस्त्य लंडनच्या Sevenoaks School मधून ग्रॅज्युट झाला आहे. काही दिवसांअगोदर श्वेता नंदाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप वायरल झाले होते. या फोटोजला फॅशन डिजाइनर अबू जानी संदीप खोसलाने सोशल मीडियावर शेअर केले होते.
अबू जानीने या पोस्टासोबत हे ही सांगितले की श्वेता आणि निखिलच्या कपड्यांशिवाय संपूर्ण लग्नाची प्लानिंग त्यांनी केली होती. श्वेताचे हे फोटो संगीत आणि लग्नाचे आहे. श्वेताने संगीतामध्ये व्हाईट कलरचा लहंगा परिधान केला होता. तसेच लग्नात रेड लहंग्यात ती फारच सुंदर दिसत होती.
श्वेताचे लग्न बंगाली पद्धतीने झाले होते. एका फोटोत श्वेता हातात पिंपळाच्या पानाने आपला चेहरा लपवत आहे. श्वेताने लग्नानंतर आपली आई जया बच्चनसोबत एक  फोटोशूट देखील करवला होता. या शूटसाठी श्वेता आणि जयाने अबू जानी यांनी डिझाइन केलेली साडी नेसली होती. दोघी व्हाईट साडीत दिसल्या होत्या.