शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जून 2020 (12:15 IST)

Solar Eclipse 2020 : 21 जून रोजी खंडग्रास सूर्यग्रहण, जाणून घ्या वेळ आणि राशींवर पडणारा प्रभाव

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. खगोलशास्त्रज्ञांसाठी ही एक खगोलीय घटना आहे, तर ज्योतिषशास्त्रासाठी ग्रहण भविष्यातील संकेतासाठीची महत्त्वाची घटना आहे. 
 
ग्रहण दोन प्रकाराचे असतात- सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. 
ह्यामध्ये देखील वेगवेगळे प्रकार असतात खग्रास किंवा पूर्ण, खंडग्रास, मांद्य, कंकणाकृती. असो, ग्रहणाला खगोलीय घटना म्हणावे किंवा ज्योतिष आणि धर्माशी निगडित करावं हे एक निर्विवाद सत्य आहे की ग्रहणाचा आपल्या पृथ्वीवर आणि ह्याच्यावर राहणाऱ्या प्रत्येक प्राण्यांवर कमीत कमी प्रभाव पडतो.
 
खगोलशास्त्राच्या मते ग्रहणाच्या वेळी सूर्य आणि चंद्रामधून अश्या काही किरणां उत्सर्जित होतात जे आपल्यासाठी हानिकारक असतात. तर काही विशिष्ट राशी आणि जन्म पत्रिकांच्या लोकांवर ह्याचा जास्त प्रभाव पडतो. 
 
वर्ष 2020 मध्ये सूर्यग्रहण 21 जून रोजी होणार आहे. 
21 जून रोजी होणारे हे ग्रहण खंडग्रास/कंकणाकृती सूर्य ग्रहण असणार. हे ग्रहण मृगशिरा आणि आर्द्रानक्षत्रा आणि मिथुन राशीवर असणार. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसणारच त्याच बरोबर बांगलादेश, श्रीलंका, रशिया, आफ्रिका, इराण, इराक, नेपाळ आणि पाकिस्तान मध्ये देखील दिसणार आहे. भारतात दिसणार असल्यामुळे या सूर्यग्रहणाचे सर्व सुतकाचे-यम -नियम भारतीयांना पाळावे लागणार.
 
ग्रहणकाळ -
तारीख - 21 जून 2020, 
संवत 2077 ज्येष्ठ कृष्ण पक्ष अमावस्या दिन रविवार.
स्पर्शकाळ - 10:01 मि. पूर्वान्ह (AM)
मध्यकाळ - 11:38 मि. अपरान्ह (AM)
मोक्षकाळ - 01:28 मि. मध्यान्ह (PM)
पर्वकाळ - 03:27 मि.
सुतक काळ - ग्रहणाचे वेध(सुतक) 20 जून 2020 रोजी रात्री 10:09 मि. (PM) पासून लागणार.
 
ग्रहणाचे फळ - 
शुभफळ - मेष, सिंह, कन्या आणि मकर.
मध्यमफळ - वृषभ, तूळ, धनू आणि कुंभ.
अशुभ फळ - मिथुन, कर्क, वृश्चिक आणि मीन.
 
वरील शास्त्रीय दिलेल्या सूचनेनुसार मध्यम आणि अशुभ असणाऱ्यांना हे ग्रहण बघणे अशुभ आणि निषिद्ध आहे. ग्रहण काळामध्ये सर्व भाविकांनी आपल्या इष्टदेवाची आराधना करणं, देणगी देणं, मंत्र, जप करणं चांगले राहील.