मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 8 जून 2020 (20:41 IST)

काय वेद, पुराण आणि नारद संहितांमध्ये उल्लेख आहे कोरोना संसर्गाबाबद

सध्याचा काळात सोशल मीडिया आणि काही टीव्ही चॅनेलवर आपल्या शास्त्राबद्दल बरेच दावा करणारे दिसून येत आहे. असा दावा करणाऱ्यांमध्ये काही प्रगाढ पंडित देखील आहेत. पण शास्त्र म्हणत की भविष्य हे अनिश्चित आहे आणि या अनिश्चित भविष्यामध्ये बऱ्याचशा घटनाक्रम निश्चित असतात. 
 
चला आधी ग्रहांची स्थिती जाणून घेऊया : 
वर्ष 2019 मध्ये मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी जास्तकाळ पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये राहिला आणि 27 डिसेंबर 2019 रोजी शनी उत्तराषाढा नक्षत्रामध्ये गेला. या संपूर्ण वर्षी शनी धनू राशीत वास्तव्यास होते. म्हणजे बृहस्पतीमध्ये राहिले. मग या वर्षी 2020 मध्ये शनी 24 जानेवारीला धनू राशीमधून निघून मकर राशीत पोहोचला. याच वर्षी 11 मे 2020 ते 29 सप्टेंबर 2020 पर्यंत शनी मकर राशी मध्ये वक्रीवस्थेत दृश्यमान होणार. याच वर्षी शनी 27 डिसेंबरला अस्त होणार. शनीचे वास्तव्य एका राशीमध्ये अडीच वर्षाचे असतात. 
 
आता ग्रहणाकडे बघू या. 2019 वर्षाचे पहिले सूर्य ग्रहण 6 जानेवारी आणि दुसरे 2 जुलै रोजी होते. वर्ष 2019 चे शेवटचे सूर्य ग्रहण भारतात दिसले. या ग्रहणाचा सुतकाचा 
 
कालावधी 25 डिसेंबर 2019 रोजी संध्याकाळी 5:33 वाजे पासून सुरू होऊन 26 डिसेंबर 2019 च्या सकाळी 10:57 पर्यंत होता. आता या 2020 वर्षाचे पहिले ग्रहण 21 जून रोजी होणार आहेत. 
 
आता संवत्सराबद्दल बोलू या : सध्या विक्रमी संवत 2076-77 पासून प्रमादी संवत्सर सुरू झाले आहे. या आधी परिधावी नावाचे संवत्सर सुरू होते. प्रमादी मुळे लोकांमध्ये आळस आणि प्रमाद(आनंद) वाढणार. 
 
नारद संहिताने दावा केला आहे की 10 हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या नारद संहितांमध्ये आधीच कोरोना साथीच्या प्रसरण आणि त्याच्या अंत होण्याच्या विषयी भविष्यवाणी केलेली आहे. दावा करणारे या साठी एका श्लोकाचे उदाहरण देत आहे.
 
भूपावहो महारोगो मध्यस्यार्धवृष्ट य:।
दु:खिनो जंत्व: सर्वे वत्सरे परिधाविनी।
 
याचा अर्थ असा आहे की परिधावी नावाच्या संवत्सरामध्ये राजांमध्ये युद्ध होणार, साथीचा आजार (महामारी) पसरेल. पाऊस देखील असामान्य असणार आणि सर्व प्राणी त्या साथीच्या आजाराला घेऊन दुखी होणार. 
 
ग्रह नक्षत्राच्या स्थितीवर दावे : 
सूर्य ग्रहण आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्रांपासून सुरू झालेला हा कोरोना विषाणू दाव्यानुसार पुढील सूर्य ग्रहणापर्यंत कमी होऊन 29 सप्टेंबर रोजी शनीच्या मकर राशी मधून निघून जाण्यापर्यंत संपून जाणार. 
 
तज्ज्ञांच्या मते, ज्या वर्षी वर्षांचा अधिपती म्हणजे राजा शनी असतो तो त्या वर्षी पृथ्वीवर महामारी आणतोच. काही लोकांचा असा दावा आहे की आयुर्वेद, वशिष्ठ संहिता आणि वृहत संहितानुसार जे आजार पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात पसरतो ते आपल्या चरमसीमेवर जाऊन लक्षावधी लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतं. कारण या नक्षत्रात पसरलेल्या आजारावर कुठलेही औषध लागू पडत नाही.
 
दाव्यानुसार वृहत संहितेमध्ये वर्णन आले आहे की 'शनिश्चर भूमिप्तो स्कृद रोगे प्रीपिडिते जना' म्हणजे की ज्या वर्षीचे राजा शनी असतात. त्या वर्षी महामारी पसरते. विशिष्ट संहितेनुसार पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये कोणता ही साथीचा आजार पसरला तर त्यावर औषधोपचार करणे कठीण जातं. 
 
विशिष्ट संहितेनुसार या महामारीचा प्रादुर्भाव तीन ते सात महिन्यापर्यंत असतो. ज्या दिवशी चीन मधून या साथीच्या आजाराचा प्रसार झाला म्हणे 26 डिसेंबर 2019 रोजी पूर्वाभाद्रपद नक्षत्र होय आणि सूर्यग्रहण देखील. दावा केला जात आहे की एका देशात ग्रहण लागल्यावर एक महामारी पसरणार.
 
भारतात 25 मार्च 2020 पासून नवसंवत्सर 2077 वर्ष लागले आहे ज्याचे नाव प्रमादी आहे आणि ज्याचा राजा बुध आणि मंत्री चंद्र आहे. प्रमादी संवत्सरामध्ये लोकांमध्ये आळस आणि आजार वाढतात. दुसरीकडे शनी वक्री झाले आहे आणि येत्या 21 जून रोजी वर्षाचे पहिले सूर्य ग्रहण आहे तर असे दावे केले जात आहे की या महामारीचा प्रादुर्भाव 21 जून येता येता कमी होईल. शनी 29 सप्टेंबर पर्यंत मकर राशीमध्ये असणार आणि तो पर्यंत हा आजार पूर्णपणे संपणार नाही. 
 
आम्ही या दाव्यांची पुष्टी करीत नाही पण काय दावे केले जात आहेत हे जाणून घ्यायचे आपले हक्क आहे. आपण आपल्या बुद्धीने काम करा. वास्तविक तर वेद पुराण किंवा नारद संहिता मध्ये कुठल्याही भविष्यवाणी बद्दल उल्लेख केलेले नाही. त्यांनी लिहिले आहे की अमुक अमुक नक्षत्रामध्ये काही आजार पसरतो किंवा अमुक अमुक संवत्सरामध्ये शोक होतो आणि राजा आपापसात लढतात. सहस्त्र वर्षात असे ग्रहण, नक्षत्र, ग्रहस्थिती, परिधावी आणि प्रदादी संवत्सर बऱ्याच वेळा येऊन गेले आणि अजून देखील येणार. 
 
आता या तर्कांवरून समजून घ्या : मी आपल्याला सांगतो की ह्या खिडकीला खोलून दिल्यावर आतमध्ये वारं येतं. म्हणजे की जेव्हा जेव्हा ही खिडकी उघडली जाणार त्या वेळी थंड वारं आत येणार. त्याच प्रकारे ज्यावेळी ग्रह, नक्षत्रांची विशेष स्थिती बनेल ह्या पृथ्वीवर रोग, शोक, युद्ध, साथीच्या रोगाचा जन्म होणारच. ही भविष्यवाणी नसून ज्योतिषी विज्ञानाची चेतावणी आहे.