कोरोना असर : चीनमध्ये घटस्फोटाच्या संख्येत वाढ
कोरोनाच्या हाहाकारामुळे जगभरात अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे चीनसह अनेक देशांत नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. एकीकडे कोरोनामुळे जगभरात मृतांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे चीनमधून घटस्फोटाच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे.
चीनमध्येही नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे घरात बंद असलेल्या दाम्पत्यांत वाद होत आहेत. हे वाद इतके वाढत कि, घटस्फोट घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. चीनमधील शिचुआन प्रांतामध्ये मागील गेल्या महिनाभरात ३००हुन अधिक जोडप्यांनी घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केल्याचे समोर आले आहे. घरात बंद असलेल्या दाम्पत्यांमध्ये हा वाद वाढत आहे, असे वृत्त एका माध्यमाने दिला आहे.
‘शेकडो दाम्पत्य आपलं लग्न मोडून घटस्फोटाचा विचार करण्यात असल्याचं डाझोऊ परिसरातील लग्न नोंदणी कार्यालयाचे व्यवस्थापक लू शिजून यांनी सांगितलं. दरम्यान, चीनसह इटली व इतर देशांतही नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे कोरोनाविषाणूचा नात्यांवर होणार असाही परिणाम दिसत आहे.