सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

माथेरानच्या मिनी ट्रेनला जोडला एसी कोच

माथेरानच्या मिनी ट्रेनला शनिवारपासून वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. माथेरान थंड हवेचे ठिकाण असले तरी नेरळपासून प्रवास करताना उन्हात प्रवाशांना उकडते. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मध्य रेल्वेने मिनी ट्रेनला एक एसी कोच जोडण्याचा निर्णय घेतला.या एसी कोचसाठी प्रवाशांना 415 रुपये मोजावे लागणार आहे.
 
माथेरानच्या राणीच्या नेरळ ते माथेरान अशा थेट फेऱ्याची नुकतीच सहा करण्यात आली आहे. तर अमन लॉज ते माथेरान शटल फेऱ्यांची सोळा करण्यात आली आहे. तसेच शनिवार आणि रविवार पर्यटकांची गर्दी पाहून माथेरान ते नेरळ आणखीन दोन अप आणि डाऊन फेरी चालविण्यात येणार आहे. त्यातच आजपासून मिनी ट्रेनला नेरळ ते माथेरान दरम्यान एक एसी डबा जोडण्यात येणार आहे. माथेरान राणीच्या इतिहासात प्रथमच हा निर्णय घेण्यात आला असून त्याचा पर्यटकांना फायदा होणार आहे. एसी डब्याच्या अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी 1-1 फेरी करण्यात येणार आहे.