मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आधी राम मंदिर कधी होणार ते सांगा, हैदराबादचे नंतर बघू - शिवसेनेची टीका

शिवसेनेन राम मंदिर मुद्दा उचलून धरला आहे. यामध्ये शिवसेना सतत भाजपवर टीका करत आहे. यात हैदराबादचे नाव बदलायचे असे सुरु तेव्हा शिवसेनेन पुन्हा भाजपवर टीका केलिया आहे. आधी राम मंदिर कधी होणार ते सांगा , राम मंदिर प्रश्न महत्वाचा आहे, हैदराबादचे आपण नंतर बघू असे बोल सुनावले आहे. तर मुघल आणि इतर राजवटी सुद्धा होत्या त्यांची नावे सुद्धा बदलली पाहिजे, विशेष करून निजामचे राज्य असलेल्या मराठवाडा भागातील अनेक शरांची नावे बदलली पाहिजे अशी भूमिका शिवसेना घेत आहे.
 
प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार हा आहे. रामाचा वनवास कधी संपणार ते सांगा. रामाचे भाग्य कधी फळेल ते जाहीर करा. योगी हे मुख्यमंत्री म्हणून प्रचारात तोफा डागत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने दुकान बंद करून प्रचाराची फळी सांभाळली आहे. जातील तेथे घोषणा व नामांतर असेच सुरू आहे. योगी यांची एक सभा मराठवाडय़ात लावा, म्हणजे औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव सहज होईल.
 
तेलंगणात भाजप सत्तेवर आल्यास हैदराबादचे नावभाग्यनगर करू, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. निजामाच्या खुणा पुसून टाकून हैदराबादचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे असेही योगींचे म्हणणे आहे. योगी हे भगवे वस्त्रधारी आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. तेलंगणात सत्ता आली तर ओवेसी बंधूंना हाकलून देऊ, असेही त्यांनी जाहीर केले आहे. तेलंगणात निजामाच्या खुणा आहेत व ओवेसी बंधू हे निजामाचे वंशज असल्यासारखेच वागतात. 
 
त्यामुळे सरदार पटेलांचा उंच पुतळा उभा करणाऱ्यांनी निजामाची वळवळ थांबवायला हवी. पटेलांनी पोलीस ऍक्शन घेऊन निजामास गुडघे टेकायला लावले, पण हैदराबादेतील मुसलमान समाज आजही निजामाच्याच काळात तरंगत आहे. असे असले तरी ओवेसी बंधू व त्यांच्या ‘एमआयएम’ पक्षाचे राजकारण भाजपसारख्या पक्षांना फलदायी ठरते असेही आक्षेप घेतले जातातच. ओवेसी यांना वापरून राममंदिर प्रश्नी देशात दंगली घडवायचा डाव असल्याची पिचकारी मुंबईतील एका राजकीय नेत्याने मारली. 
 
ओवेसी म्हणजे भाजपची बटीक असल्याचा आरोप देशातील इतर पक्षही करतात.ओवेसींबरोबर आता प्रकाश आंबेडकर आहेत. त्यामुळे उत्तरेत व इतरत्र काँग्रेसचे नुकसान तसेच भाजपचा कसा फायदा होईल अशी गणिते मांडली जात आहेत. त्यामुळे योगी यांनी हैदराबादचे भाग्यनगर करायचे ठरवले या भूमिकेस महत्त्व आहे. पण निजाम-बाबराच्या खुणा फक्त हैदराबादेतच आहेत काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. संपूर्ण देशभरात आहेत. आमच्या मराठवाडय़ाने निजामाचा अत्याचार सोसला आहे. 
 
त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव कधी होणार? पुन्हा खुल्ताबाद, अहमदनगर ही नावे आहेतच.