मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत घरपोच दारू मागवल्याने फसवणूक

मुंबईत वेबसाईटवरील वाईन शॉपच्या फोन नंबरमध्ये बदल करून फसवणूक करणाऱ्या भुरट्यां चोरांची संख्या वाढली आहे. मुंबईतल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये घरपोच दारू मागवल्याने फसवणूक झाल्याच्या सहा तक्रारी दाखल झाल्या आहेत.
 
मुंबई पोलिसांकडे तक्रार आलेल्या वांद्रे येथील रहिवासी निरज कोल्लाह यांनी जेव्हा घरपोच दारू मागवण्यासाठी वेबसाईटवरील वाईनशॉपच्या नंबरवर फोन केला होता. त्यावेळी त्यांना ई- वॉलेटने दारूचे पेमेंट करायला सांगितले. पेमंट केल्यावर बराच वेळ वाट बघूनही दारू घरपोच होत नसल्याने त्यांनी संबंधित नंबरचे लोकेशन तपासले असता तो नंबर राजस्थानमध्ये असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे घरपोच दारू मागवल्यामुळे निरज यांना 1 हजार 300 रुपयांचा गंडा बसला. याच पद्धतीने चेंबुर येथील एका ग्राहकाची देखील अशाच पद्दतीने फसवणूक झाली आहे. मुंबईत अशा प्रकारची फसवणूक झाल्याच्या तक्रारी वांद्रे, खार, सांताक्रुज, घाटकोपर या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.