सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अनुप जलोटाशी संबंधावर खरं काय ते सांगितले जसलीनने

भजन सम्राट अनुप जलोटा जेव्हा जसलीन मथारू सह बिग बॉस 12 मध्ये एंटर झाले होते तेव्हा पासून दोघांच्या रिलेशन‍शिपची खूप चर्चा सुरु होती. परंतू बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर अनुपने रिलेशनशिप खोटं असल्याचे सांगितले होते. आता जसलीनने पण घरातून बाहेर आल्यावर रिलेशनबद्दल असेच काही सांगितले आहे.
 
एका इंटरव्यूमध्ये जसलीनने सांगितले की मी अनुपसह प्रेमाचं नाटक करण्याचा प्रँक केले होता. हे नाटक फसले. शोच्या थीमप्रमाणे मीच अनुपजी यांना शो मध्ये माझ्यासोबत चलायला म्हटले होते परंतू आमची जोडी गुरु-शिष्याची होती. मी चेष्टा केली होती की मी आणि अनूप मागील तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत आणि अशी थट्टा करतच आम्ही शोमध्ये गेलो, परंतू ही चेष्टा माझ्यावर उलटली आणि मला आणि माझ्या कुटुंबाला ठेच लागली.
 
मी बाहेर आल्यावर कळले की तर हैराण झाले की माझे आणि अनुपजी यांचे नातं देशभरासाठी चर्चेचा विषय झाला.
 
अनुप जलोटा यांनी देखील बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर म्हटले होते की जसलीन त्यांना मुलीसारखी आहे. त्यांनी म्हटले की हे केवळ एंटरटेन करण्यासाठी रचवण्यात आलेले नाटक होतं. जसलीन केवळ त्यांची शिष्या आहे.