मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

‘शक्तिमान’चे दोन सिझन अॅमेझॉन प्राइमवर

‘शक्तिमान’चे दोन सिझन अॅमेझॉन प्राइमवर आले आहेत. यामुळे मुकेश खन्नाची मुख्य भूमिका असलेली ही मालिका आता डिजीटल प्लॅटफॉर्मवर सर्वांनाच पाहायला मिळणार आहे.  नव्वदच्या दशकात डीडी नॅशनलवरील ही सर्वाधिक कमावणारी मालिका होती. १३ सप्टेंबर १९९७ ते २७ मार्च २००५ या कालावधीत ही मालिका प्रसारित झाली.
 
‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या दोन्ही भूमिका साकारणाऱ्या मुकेश खन्नाने सर्वांची मनं जिंकली होती. ‘कानून का दोस्त, मुर्जिमों का दुश्मन,’ हे शक्तिमानचे तर ‘अंधेरा कायम रहे,’ हे किल्विश या खलनायकाचे संवाद तुफान गाजले. मालिकेच्या शेवटी येणाऱ्या ‘छोटी छोटी मगर मोटी बातें’ यातून दिला जाणारा सामाजिक संदेश आणि ‘सॉरी शक्तिमान’ हा माफी मागतानाचा शब्द  अनेकांच्या आठवणीत आहेत.