1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालकथा

उपद्व्यापी माकड

बालजगत
Wd
एकदा एका गावामध्ये राहणार्‍या धनाढ्य माणसाने गावाबाहेरील वनराईत एक देऊळ बांधण्याचे ठरवले. त्यासाठी बांधकाम साहित्य आणले होते. सु्तार, गावंडी आणि मजूर तेथे काम करीत होते. जवळच्या एका झाडावर माकडांचा थवा बसला होता. दुपारच्यावेळी सगळे कामगार जेवायला गेले होते.

WD
त्याबरोबर सगळी माकडे झाडावरून खाली येऊन त्या बांधकाम साहित्यावर नाचू बागडू लागली. सुतारानी एका मोठ्या लाकडला करवतीने कापून त्यात पाचर बसवली होती. एका उपद्व्यापी माकडाने ती पाचर बघितली. त्या लाकहावर बसून ती पाचर काढायचा प्रयत्न ते उपद्व्यापी माकड करू लागले.

त्या प्रयत्नात ती पाचर बाहेर पटकन आली पण शेपटी मात्र त्या लाकडाच्या चिमटीत अडकली. मरणप्राय वेदना त्या माकडाला होत होत्या. माकडाच्या ओरडण्याने मजूर धावत आले. त्यानी त्याला मरेस्तोवर बडवले... ‍आणि उपद्‍व्यापी माकड प्राणास मुकले.

उपदेश : जी गोष्ट आपल्याला माहीत नाही किंवा कळत नाही त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यात उचापती करू नये.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा