बोल माझ्या फुला
- सुरेश भट
रंग माझा तुला, गंध माझा तुला,बोल काही तरी, बोल माझ्या फुलासांग लाजूनही नाव आता तरी एक खोळंबले गीत माझ्या उरीअन वसंतास शब्द मी माझा दिलावेळ जादू भरी ही गुलाबी हवाही न मेंदी तुझी रंग माझा नवाभास झाला खरा, श्वास झाला खुला हाय माझी-तुझी भेट झाली अशी शीळ यावी पुढे चांदण्यांची जशीसांग सोडू कसा हात हातातलाबोल काही तरी बोल माझ्या फुला